Posts

युद्ध विद्युत प्रवाहांचे !!

Image
युद्ध विद्युत प्रवाहांचे !!      युद्धस्य कथाः रम्यः हे जरी खरे असले तरी या लेखातील युद्धात तलवारींचे खणखणाट नाहीत, तोफांचे कडकडाट नाहीत, इतकेच काय तर सैनिक ही नाहीत. हां …थोडी फार जिवित हानी मात्र आहे. हे युद्ध ना कोणत्या देशांच्यात लढलं गेलंय, ना दोन राज्यांच्यात. या युद्धाचे सेनापती आहेत तत्कालीन सुप्रसिद्ध संशोधक, गणिती आणि शास्त्रज्ञ. एकाचे नाव आहे थॉमस एल्वा एडिसन आणि दुसरे आहेत निकोला टेस्ला. तिसरे आहेत जॉर्ज वेस्टिंगहाउस. या पैकी एडिसन हे आपणा सर्वांना परिचित आहेतच. १८७० च्या शेवटी त्यांनी विजेवर प्रकाशित होणार्या दिव्याची निर्मिती केली होती. एडिसन हे शास्त्रज्ञ होतेच, पण त्यापेक्षा चांगले व्यावसायिक होते. त्यांनी त्यांच्या या शोधाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी विद्युत प्रकल्प उभे केले. आणि विद्युत वाहक तारांद्वारे वीज ग्राहकापर्यंत पोचवण्याची यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली. एडिसन यांचे विद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे वाफेवर चालणारी इंजिन्स आणि विद्युत जनित्र होती. अधिक सोप्या मराठीत जनित्र म्हणजे जनरेटर !!!    वाफेच्या इंजिनाने निर्माण झालेली यांत्रिक उर्जा जनित्रा द्वा